Wednesday, July 10, 2013

जेव्हा शेतकरी जीव देतो

जेव्हा शेतकरी जीव देतो
बेटा, काकांनी तुझ्या विष पिलं
धनगर काकूंनी  रडत रडत सांगितलं.
शेतकरयाचा जन्म घेतला म्हणे पापं आपण केलं
फरक नही कुणाला, माणूस मेला कि कुत्रं मेलं
सांगून गेलेत कि मला आपल्याच जमिनीत पूरा
निदान शरीराचे खत होऊन जनावरांना तरी मिळेल चारा
सरकारी डॉक्टरच तर चांगलच भलं झाले
म्हणे आत्महत्येचा  रिपोर्ट देईल, जर दहा हजार  दिले
कंटाळून, विहिरीत जीव दिला काकुंनी चिमेला सोबत घेऊन 
महिना झाला होता तेव्हा काकांना देवाघरी जाऊन 
भयाण झालंय अंगण, भयाण झालाय वाडा
अनाथ झाली जनावरं, मोडून पडला संसाराचा गाडा
नंतर, गेली सोडून काकांची सर्वात जुनी गाय 
म्हटली असेल,जगून मी तरी करू काय  
कुठे गेली माणुसकी? अशीच आहे का माणसाची जात?
का हतबल झालोय मी? कधी होईल यावर मात?
शोधत होतो उत्तर तोच पुन्हा निरोप आला,
आणि यावेळी, दिनकर काकांनी जीव दिला ...

                                                            >> पंकज नारायण

मनि-म्याऊ

मनि-म्याऊ
दहाविमा व्हतु मी, आश्रम शाळामा जाऊ
हेडमास्तरनि पोर ती, तिल्हे देखत राहू
इचार करा एकदिन, तिन्हा जोडें जाऊ
घाबरू म्हणो तिन्ही, तुल्हे मानस मी भाऊ
इकत लिधं ग्रीटिंग, देढ महिना जवय नही खादा खाऊ
दिन्ह ग्रीटिंग तिल्हे, जवय वाजेल व्हतात नऊ
त्यान्हा नंतर आठदिन, शाळामा नही गऊ
निरोप धाडा तिन्ही, नको इतला सरमाऊ
मी शे तुन्ही मनि, आणि तू मन्हा म्याऊ
                                                >> पंकज नारायण

मन्ही माय

मन्ही माय  
मन्हा मायनी कहाणी काय सांगू तुमले
    राब राब राबनी तिन्ही शिकाड माले.
उनी उनी दिवाई, उना उना दसरा,
    म्हने माले भाऊ,लीले तुले सदरा.
उना उना दसरा, नको नको माले सदरा,
    माय मन्ही दे, माले बस तुना आसरा.
शिक शिक शिकना, दूर दूर तू गया,
    कधी नको इसरू ह्या मायनी तू छाया.
माय माय तू मन्ही, नको आस म्हणू,
   कितालाभी दूर गऊ, ऱ्हासु तूनच वासरू
रड रड रडणी, म्हने लेक मना न्यारा,
    माय मी तुन्हीमाले बस तुना सहारा.
रोज रोज ती, वाट मन्ही देखस,
    गावले ती मन्हा एखलीस राहस.
चाल चाल पूनाले, काम मन्ह देखिले,
    हासी सनी म्हने, इतला दूर जमो नही येवाले.
मोठ मोठ तुण गाव, मोठ मोठ तुन्ह काम,
    लोक हासतीन तुले, अड़ानी शे तुन्ही माय.
गोड गोड माय, हाउ तुना गैरसमज,
    तून्हा पेक्षा आठे, नही कोनले उमज.
दिन रात पाणी पेसू, धुइसनि तून्हा पाय,
    जन्मो जनम भेटो, माले तूच मन्ही माय.
ऐक ऐक देवं, सांगस मी तुले काय,
    खरंच ! तुना पेकषा मोठी शे मन्ही माय !! मन्ही माय !!!
                                                                   >> पंकज नारायण